मुंबई मधील सर्व सुट्टीच्या, आरटीजीएस कार्यरत असलेल्या दिवशीही, आरबीआय रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करणार |
फेब्रुवारी 17, 2016
मुंबई मधील सर्व सुट्टीच्या, आरटीजीएस कार्यरत असलेल्या दिवशीही,
आरबीआय रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करणार
मार्केटमधील सहभागींना अधिक चांगले तरलता व्यवस्थापन करण्यास मदत व्हावी, आणि तरलता कार्यकृतींचा प्रदान प्रणालींशी मेळ घालण्यासाठी, रिझर्व बँकेने, मुंबईमधील सर्व सुट्टीच्या दिवशी आरटीजीएस चालु असताना, रिव्हर्स रेपो व एमएसएफ कार्यकृती करण्याचे ठरविले आहे.
फेब्रुवारी 19, 2016 पासून हा बदल अंमलात येईल. रिव्हर्स रेपो/एमएसएफ व्यवहारांची वेळ, अशा सुट्ट्यांच्या दिवशी संध्याकाळी 5.30 ते 7.30 असेल.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1951 |
|