Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/02/2016
रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना, आरबीआयकडून, ऑगस्ट 21, 2016 पर्यंत मुदतवाढ

फेब्रुवारी 23, 2016

रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना, आरबीआयकडून,
ऑगस्ट 21, 2016 पर्यंत मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने, फेब्रुवारी 18, 2016 रोजीच्या निदेशानुसार, रुपी सहकारी बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना, पुनरावलोकनाच्या अटीवर, फेब्रुवारी 22, 2016 ते ऑगस्ट 21, 2016 पर्यंत, सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. प्रत्येक बचत खाते, चालु खाते किंवा मुदत ठेव खाते किंवा दुसरे कोणतेही ठेव खाते (कोणतेही नाव असलेले) ह्यामधून, रु.20,000/- (रुपये वीस हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास त्या ठेवीदाराला ही बँक परवानगी देऊ शकते - मात्र अशा ठेवीदाराची बँकेबाबत काही दायित्व/जबाबदारी असल्यास, (म्हणजे ठेवीदार एक हमीदार असल्यास, बँक ठेवी विरुध्द कर्ज घेतले असल्यास) ही रक्कम प्रथम त्या कर्जखात्यात समायोजित केली जावी. हे निदेश सुरुवातीला फेब्रुवारी 22, 2013 ते ऑगस्ट 21, 2013 पर्यंत जारी करण्यात आले होते व त्यानंतर प्रत्येकी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चार वेळा, आणि प्रत्येकी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दोन वेळा त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदतवाढ, ऑगस्ट 22, 2015 ते फेब्रुवारी 21, 2016 पर्यंत, म्हणजे सहा महिन्यांसाठी देण्यात आली होती.

बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित, ह्या अधिनियमाच्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) ने दिलेल्या अधिकारांचा वापर करुन हे निदेश जारी करण्यात आले होते. जनतेच्या माहितीसाठी, ह्या निदेशांची एक प्रत, वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, वरील बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे असा धरला जाऊ नये. ह्या बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ही बँक, निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करु शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात बदल करण्याबाबत रिझर्व बँक विचार करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/1992

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä