फेब्रुवारी 26, 2016
दि. नाशिक मर्चंट्स सहकारी बँक लि., नाशिक
ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड जारी
भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग रेग्युलेशन अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित त्या अधिनियमाच्या कलम 47अ(1)(क) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, दि. नाशिक मर्कंटाईल सहकारी बँक लि., नाशिक, ह्यांना रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड ठोठावला. मागील संचालक मंडळाच्या कार्याकालात, भारतीय रिझर्व बँकेने, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निकष/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) उपाय/दहशतवादाला अर्थसहाय्याविरुध्द सामना (सीएफटी)/प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अधिनियम (पीएमएलए) खाली बँकांची जबाबदारी इत्यादिबाबत, रिझर्व बँकेचे निदेश/मार्गदर्शक तत्वे/सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे करण्यात आला आहे.
रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि तिला वरील बँकेने लेखी उत्तर दिले होते, तसेच मौखिक सादरीकरणही केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर ह्यावर विचार केल्यावर, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2033 |