मार्च 9, 2016
नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र
ह्यांना दिलेल्या निदेशांना, आरबीआयकडून 9 सप्टेंबर, 2016 पर्यंत मुदतवाढ
भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना, निदेश सप्टेंबर 8, 2015 अन्वये, सप्टेंबर 9, 2015 रोजीचे व्यवहार संपल्यापासून, सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या दिनांक 3 मार्च 2016, निदेशांची वैधता, मार्च 9, 2016 रोजीचे व्यवहार संपल्यापासून सप्टेंबर 9, 2016 पर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, पुनरावलोकनाच्या अटीवर आणि पुढील बदलांच्या अटींवर वाढविण्यात आली आहे.
(1) प्रत्येक बचत खाते किंवा चालु खाते किंवा मुदत ठेव खाते किंवा (कोणतेही नाव दिलेले) अन्य कोणतेही ठेव खाते, ह्यामधील एकूण शिल्लकीमधून, रु.10,000/- (रुपये दहा हजार) पर्यंतची रक्कम ठेवीदारांना काढता येईल. - मात्र, त्या ठेवीदाराला बँकेबाबत कोणतेही दायित्व/जबाबदारी (म्हणजे, कर्जदार/हमीदार असणे, बँक ठेवींविरुध्द कर्ज घेतले असणे) असल्यास, ती रक्कम सर्वप्रथम त्या कर्जखात्यामध्ये समायोजित केली जावी.
संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
वरील मुदतवाढ दिलेली असलेल्या मार्च 3, 2016 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित केली आहे.
आरबीआयने केलेली मुदतवाढ/बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा लावला जाऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2118 |