Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (288.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/03/2016
अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दिलेल्या निदेशांना सप्टेंबर 30, 2016 पर्यंत मुदतवाढ

मार्च 30, 2016

अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून दिलेल्या निदेशांना
सप्टेंबर 30, 2016 पर्यंत मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली, सप्टेंबर 28, 2015 च्या निदेशानुसार, सप्टेंबर 30, 2015 रोजी व्यवहार संपल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, मार्च 29, 2016 रोजीच्या सुधारित निदेशांच्या अन्वये, अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा ह्यांना, सप्टेंबर 28, 2015 रोजी दिले गेलेले निदेश त्यांना आणखी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, म्हणजे सप्टेंबर 30, 2016 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असणे सुरुच राहील. ह्या निदेशाच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्च 29, 2016 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदल/सुधारणेचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा लावण्यात येऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2301

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä