मार्च 31, 2016
दि जंबुसार पिपल्स सहकारी बँक लि. जंबुसार जिल्हा, भरुच (गुजराथ) ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड आकारणी
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) अन्वये तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने जंबुसार पिपल्स सहकारी बँक लि., जंबुसार, जिल्हा भरुच (गुजराथ) ह्यांना रु.3.0 लाख (रुपये तीन लाख) दंड लावला आहे व तो, बी. आर अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 36(1) खाली दिलेल्या कार्यकारी सूचना, सहकारी प्रतिभूतींचे धारण व एएमएलबाबतचे उपाय ह्यांचे उल्लंघन, एफआययु-आयएनडी, नवी दिल्ली ह्यांना रोख व्यवहारांचा अहवाल न पाठविणे व शंकास्पद व्यवहार ओळखण्यासाठी प्रणाली न ठेवणे ह्यासाठी लावण्यात आला आहे.
31.3.2015 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीत आढळून आल्यानुसार, भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर त्या बँकेने एक लेखी उत्तर पाठवून, अहमदाबाद येथील आरबीआयचे प्रादेशिक संचालक ह्यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ अधिका-यांच्या समिती (सीएसओ) समोर व्यक्तिगत सादरीकरण केले होते. ह्या प्रकरणातील सूक्ष्म बाबी आणि बँकेने दिलेले उत्तर विचारात घेतल्यानंतर रिझर्व बँक ह्या निर्णयाप्रत आली की वरील उल्लंघने सिध्द झाली असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2317 |