नगर सहकारी बँक लि., गोरखपुर - दंड लावण्यात आला |
मे 02, 2016
नगर सहकारी बँक लि., गोरखपुर - दंड लावण्यात आला
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, नगर सहकारी बँक लि., गोरखपुर ह्यांना, त्यांनी वैधानिक अहवाल सादर न केल्याने वरील अधिनियमाच्या कलम 27 चे उल्लंघन झाले असल्याने, त्यांना रु.1.0 लाख (रुपये एक लाख) दंड लावला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिसीला तिने उत्तर सादर केले नाही. ह्या प्रकरणातील सत्य बाबी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निर्णय घेतला की वरील उल्लंघन सिध्द झाले असून त्याबाबत दंड लावणे आवश्यक आहे.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन: 2015-2016/2553
|
|