“डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र” ह्यांना दिलेले निदेश आरबीआयकडून मागे घेण्यात आले. |
मे 03, 2016
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र” ह्यांना दिलेले निदेश आरबीआयकडून मागे घेण्यात आले.
भारतीय रिझर्व बँकेने, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद, महाराष्ट्र” ह्यांना, मे 4, 2012 रोजी दिलेले सर्व समावेशक निदेश, मे 2, 2016 रोजी व्यवहार संपल्यापासून मागे घेतले आहेत.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35अ च्या पोट कलम (2) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निदेश मागे घेतले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी, ह्या आदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित केली आहे. ह्यानंतर वरील बँक तिचा नियमित बँकिंग व्यवसाय सुरु ठेवू शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2562 |
|