मे 06, 2016
भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेमध्ये
आरबीआयकडून मुदतवाढ
भारतीय रिझर्व बँकेने भोपाळ नागरीक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्य प्रदेश) ह्यांना, त्यांना लागु केलेल्या निदेशांना, पुनरावलोकनाच्या अटीवर, मे 1, 2016 ते ऑक्टोबर 31, 2016 अशी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली ऑक्टोबर 31, 2012 रोजी दिलेल्या निदेशांखाली वरील बँक, ऑक्टोबर 31, 2012 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून ह्या निदेशांखाली होती. वरील निदेशाची वैधता वेळोवेळी सहा सहा महिन्यांनी वाढविण्यात आली होती आणि अलिकडेच ती, पुनरावलोकनांच्या अटीवर, एप्रिल 20, 2016 च्या निदेशान्वये मे 1, 2016 पासून ऑक्टोबर 31, 2016 पर्यंत वाढविण्यात आली होती.
भारतीय रिझर्व बँकेने ह्या निदेशात बदल/सुधारणा केली ह्याचा अर्थ वरील बँकेच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा किंवा घट झाली असल्याचे समजले जाऊ नये. संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. जनतेच्या माहितीसाठी ह्या निदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. परिस्थितीवर अवलंबून रिझर्व बँक ह्या निदेशामध्ये बदल करण्याचा विचार करु शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2592 |