Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (117.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/05/2016
आरबीआयकडून रिसर्च इंटर्नशिप योजनेची सुरुवात

मे 06, 2016

आरबीआयकडून रिसर्च इंटर्नशिप योजनेची सुरुवात

केंद्रीय बँकिंगमध्ये खास/नवीनतम संशोधन करण्यासाठी तरुण व्यक्तींना वाव व संधी मिळावी ह्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने रिसर्च इंटर्नशिप योजना सुरु केली आहे. ही योजना अलिकडेच स्नातक झालेल्या आणि अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त किंवा संबंधित क्षेत्रात पीएचडी करु इच्छिणा-या किंवा सरकारी संशोधन संस्थांमध्ये किंवा संख्यात्मक विश्लेषणात्मक कल आवश्यक असलेल्या वित्तीय संस्थांमध्ये निरनिराळी पदे मिळविण्याची महत्वाकांक्षा असलेल्या व्यक्तींसाठी आहे. ह्या योजनेचे मुख्य पैलू पुढीलप्रमाणे आहेत.

भूमिकेचे वर्णन

असा विद्यार्थी (इनटर्न) रिझर्व बँकेमधील संशोधकांना, चांगल्या दर्जाच्या आर्थिक व वित्तीय मासिकांमध्ये धोरणात्मक बाबी व त्याबाबतचे लेख प्रसिध्द करण्यासाठी असलेल्या प्रकल्पांसाठी साहित्य (इनपुट) उपलब्ध करुन देण्यास मदत करील व समन्वय साधेल. हा इंटर्न, बिनचुक व वेळेवारी माहिती संकलित करण्यास मदत करील आणि तो संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यास आवश्यक असलेल्या विश्लेषणात्मक, सांख्यिक व अर्थशास्त्रीय साधनांद्वारे मदत करील. असा विद्यार्थी सुयोग्य दर्जाचे संशोधनात्मक व धोरणात्मक निबंधही तयार करु शकेल.

अर्हता

अर्जदारांनी तीन वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट डिग्री अभ्यासक्रम पूर्ण केला असावा आणि त्या व्यतिरिक्त एक वर्ष पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम पूर्ण केला असावा किंवा बीटेक किंवा बीई ह्यासारखा 4 वर्षांचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. रिझर्व बँक, अर्थशास्त्र, वित्त किंवा सांख्यिकी विज्ञान ह्यामधील सांख्यिक कल असलेल्या पदव्या मिळविलेले किंवा संगणक किंवा डेटा अॅनालिटिक्स किंवा अभियंत्रिकी ह्यात पारंगत असलेल्या उमेदवारांना पसंती देते. प्रोग्रामिंगची कैाशल्ये किंवा ती मिळविण्याची क्षमता अत्यावश्यक आहे. रिझर्व बँकेचे वातावरण उमेदवारांना शिकण्याच्या व संशोधनात भाग घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध करुन देईल. उमेदवारांना, रिझर्व बँकेच्या संशोधनामधील मुख्य (कोअर) क्षेत्रात काम करण्यात रस असणे आणि ह्या क्षेत्रात केलेल्या कामाचा लाभ घेण्याची क्षमता असणेही आवश्यक आहे. ही संधी देशांतर्गत तसेच विदेशी विद्यार्थ्यांनाही उपलब्ध आहे. कामाचा पूर्व-अनुभव असणे आवश्यक नाही.

अर्ज करण्याची रीत

ही निवड वर्षातून दोन वेळा व रिझर्व बँकेच्या आवश्यकतेनुसार अशा प्रकारे केली जाईल की इंटर्नशिप जानेवारी 1 किंवा जुलै 1 ला सुरु होईल. संबंधित सहामाहीच्या पहिल्या पाच महिन्यात अर्ज-खिडकी सुरु असेल. उदाहरणार्थ, जानेवारी 1 पासून सुरु होणा-या इंटर्नशिपसाठीचे अर्ज जुलै-नोव्हेंबरमध्ये स्वीकारले जातील आणि ते त्यामागील वर्षाच्या डिसेंबरमध्ये तपासले जातील. त्याचप्रमाणे जुलै 1 पासून सुरु होणा-या इंटर्नशिपसाठीचे अर्ज, जानेवारी-मे दरम्यान स्वीकारले जातील आणि ते जूनमध्ये तपासले जातील. सीव्ही, संदर्भ आणि स्टेटमेंट ऑफ परपज ह्यावर आधारित हे उमेदवार शॉर्ट लिस्ट केले जातील आणि त्यांना व्यक्तिगत मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा सीव्ही, संदर्भ व स्टेटमेंट ऑफ परपज, ई-मेल द्वारा, त्यांना पाहिजे असलेल्या संशोधन क्षेत्राच्या/विभागाच्या ई-मेल आयडीकडे पाठवावेत. म्हणजेच, आर्थिक व धोरणात्मक संशोधन विभागासाठी (डीईपीआर) ई-मेल पाठविण्यासाठी येथे क्लिक करा. सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभागांसाठी (डीएसआयएम) ई-मेल पाठविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा आणि कृतीयोजना (स्ट्रॅटेजिक) संशोधन एककाला (एसआरयु) ई-मेल पाठविण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

निवड करण्याची रीत

रिझर्व बँक प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त दहा इंटर्नची निवड करते. ह्या इंटर्न्सना, आर्थिक व धोरणात्मक संशोधन विभाग (डीईपीआर)/सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग (डीएसआयएम)/कृतीयोजनात्मक संशोधन एकक (एसआरयु) मध्ये प्रवेश दिला जाईल.

कालावधी

ही इंटर्नशिप 6 (सहा) महिन्यांसाठी असेल आणि एककाची गरज व इंटर्नची कामगिरी ह्यावर अवलंबून ती आणखी 6 (सहा) महिन्यांसाठी वाढविली जाऊ शकेल. असाधारण कामगिरी करणारांचा आणखी मुदतवाढ देण्याबाबत विचार केला जाईल (इंटर्नशिपचा एकूण कालावधी प्रत्येक सहा महिन्यांनंतर मुदतवाढीच्या तरतुदीसह दोन वर्षांचा असेल).

ही इंटर्नशिप भारतामध्ये मुंबई येथे असेल. कोणतेही कारण न देता ही इंटर्नशिप समाप्त करण्याचा अधिकार रिझर्व बँकेने राखून ठेवला आहे.

सुविधा

ह्या इंर्टन्सना, रिझर्व बँक, कार्यालयाची जागा, इंटरनेट जोडणी आणि इतर पूरक सुविधा उपलब्ध करुन देईल. रिझर्व बँक दरमहा रु.35,000/- शिष्यवृत्ती/भत्ता देऊ करील. राहण्याच्या जागेची व्यवस्था इंटर्नस्नी स्वतःच करावयाची आहे.

नेमणुकीचा हक्क नाही

इंटर्नशिप केल्यामुळे रिझर्व बँकेतच नोकरी मिळविण्याचा हक्क/दावा इंर्टन्सना नाही.

ह्या योजनेची अधिक माहिती रिझर्व बँकेच्या वेबसाईटवरुन https://opportunities.rbi.org.in/scripts/bs_viewcontent.aspx?Id=3167 मिळविता येईल.

संगिता दास
संचालक

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2600

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä