मे 09, 2016
रिझर्व बँक इनसेट अक्षर “R” असलेल्या रु.1000 च्या बँक नोटा प्रसृत करणार
भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील व दोन्हीही अंक-फलकांमध्ये ‘R’ हे अक्षर असलेल्या रु.1000 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या बँक नोटांच्या दर्शनी बाजूवर वाढत्या आकाराचे अंक, ब्लीड लाईन्स, मोठे ओळख चिन्ह व भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन ह्यांची सही ह्यासह इतर सर्व सुरक्षा चिन्हे असतील. ह्या नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्षही असेल.
आता प्रसृत केल्या जाणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, पूर्वी दिल्या गेलेल्या व महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु.1000 च्या नोटांप्रमाणेच असेल.
रिझर्व बँकेने, पूर्वी दिलेल्या रु.1000 मूल्यांच्या बँक नोटा तसेच अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या परंतु ब्लीड लाईन्स व मोठे ओळख चिन्ह नसलेल्या रु.1000 च्या बँक नोटाही एक वैध चलन असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2611 |