Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (61.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/05/2016
शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून नोव्हेंबर 17, 2016 पर्यंत मुदतवाढ

मे 16, 2016

शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे, जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना
आरबीआयकडून नोव्हेंबर 17, 2016 पर्यंत मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, शताब्दी महिला सहकारी बँक लि., ठाणे ह्यांना, ऑगस्ट 14, 2014 रोजीच्या निदेशान्वये, ऑगस्ट 20, 2014 रोजीचे व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशाखांली ठेवण्यात आले होते. वरील निदेशांची वैधता, निदेश दि. फेब्रुवारी 4, 2015, दि. जुलै 21, 2015 आणि दि. नोव्हेंबर 4, 2015 अन्वये अनुक्रमे सहा महिन्यांसाठी, तीन महिन्यांसाठी व सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, निदेश दि. फेब्रुवारी 4, 2015 व निदेश दि. जुलै 21, 2015 आणि निदेश दि. नोव्हेंबर 4, 2015 सह वाचित, निदेश दि. ऑगस्ट 14, 2014 च्या कार्यकालाची वैधता, मे 17, 2016 रोजी कामकाज/व्यवहार बंद झाल्यापासून ते नोव्हेंबर 17, 2016 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटींवर आमचे सुधारित निदेश दि. मे 10, 2016 अन्वये, आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली आहे. इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. दि. मे 10, 2016 च्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने वरीलप्रमाणे केलेल्या बदलाचा अर्थ, ह्या बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबद्दल रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेतला जाऊ नये.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2671

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä