एप्रिल 07, 2016
मेसर्स सन कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. (सध्या मे. ममता ग्रुप कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. म्हणून
ओळखली जाणारी) ह्यांना आरबीआयकडून दंड-आकारणी
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 58-जी नुसार तिला मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, मे. सन कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. (सध्या, मे. ममता ग्रुप कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. म्हणून ओळखली जाणारी), पंजीकृत कार्यालय, 53, मधुबन, मादलपुर अंडरब्रिज जवळ, एलिसब्रिज, अहमदाबाद, 380006 गुजराथ ह्यांना रु.5.00 लाख (रुपये पाच लाख फक्त) दंड लावला असून तो दंड, ह्या बँकेने जून 14, 2011 च्या अधिसूचनेमधील, ह्या बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविल्याशिवाय विदेशात गुंतवणुक करण्याबाबतचे उल्लंघन केले गेल्याने आणि ह्या बँकेने जानेवारी 13, 2000 रोजी दिलेल्या परिपत्रकात दिल्यानुसार, कंपनीचे नाव बदलण्यासाठी रजिस्टार ऑफ कंपनीकडे जाण्यापूर्वी त्यासाठी ह्या बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र न घेतल्याने लावण्यात आला आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2373 |