जून 02, 2016
इनसेट अक्षर ‘व्ही’ असलेल्या रु.10 च्या बँक नोटा आरबीआय प्रसृत करणार
भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘V’ हे इनसेट अक्षर असलेल्या व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी. राजन ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील रु.10 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेले असेल.
ह्या बँक नोटांचे डिझाईन सर्व बाबतीत, पूर्वी दिलेल्या महात्मा गांधी मालिका-2005 मधील रु.10 च्या नोटांप्रमाणेच असेल.
पूर्वीच्या काळात ह्या बँकेने प्रसृत केलेल्या रु.10 च्या बँक नोटाही वैध चलन असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2802
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä