दि म्हापसा नागरी सहकारी बँक ऑफ गोवा लि., म्हापसा, गोवा ह्यांना आरबीआयकडून दंड लागु |
जून 06, 2016
दि म्हापसा नागरी सहकारी बँक ऑफ गोवा लि., म्हापसा, गोवा ह्यांना
आरबीआयकडून दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ (1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि म्हापसा नागरी सहकारी बँक ऑफ गोवा लि., म्हापसा, गोवा ह्यांना, त्यांच्याद्वारे, मुदत ठेवींवरील व्याज प्रदान, एकल व गट कर्जाबाबतच्या एक्सपोझर मर्यादा व अप्रतिभूतित अग्रिम राशींचे प्रदान ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेले निदेश/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्याबद्दल रु.5.00 लाख (रुपये पाच लाख फक्त) दंड केला आहे.
रिझर्व बँकेने ह्या बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि तिने त्यावरील लेखी उत्तरही सादर केले होते. तसेच त्यावर तोंडी सादरीकरणही केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बाबी व त्या बँकेने दिलेले उत्तर विचारात घेता, रिझर्व बँक निर्णयाप्रत आली की उल्लंघन झाल्याचे सिध्द झाले असून दंड लावणे आवश्यक आहे.
संगिता दास
संचालक
वृत्तपत्र निवेदन : 2015-2016/2829 |
|