Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (104.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 25/08/2016
आरबीआय कडून एसबीआय व आयसीआयसीआय बँक ह्यांना 2016 मध्ये, डी-एसआयबी म्हणून मान्यता

ऑगस्ट 25, 2016

आरबीआय कडून एसबीआय व आयसीआयसीआय बँक ह्यांना 2016 मध्ये, डी-एसआयबी म्हणून मान्यता

आरबीआयने भारतीय स्टेट बँक (एसबीआय) व आयसीआयसीआय बँक ह्यांना 2016 पर्यंत डॉमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँका (डी-एसआयबी) म्हणून मान्यता दिली असून त्यांचे बकेटिंग स्ट्रक्चर गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवले आहे. ह्या बँकांसाठीची अतिरिक्त कॉमन इक्विटी टायर-1 आवश्यकता (सीईटी 1) एप्रिल 1, 2016 पासून टप्प्याटप्प्याने करण्यात आली असून ती एप्रिल 1, 2019 पासून पूर्णत्वाने सक्षम झालेली असेल. ही अतिरिक्त सीईटी-1 आवश्यकता कॅपिटल कंझर्वेशन बफरच्या व्यतिरिक्त असेल.

2016 साठीची डी-एसआयबीची अद्ययावत यादी पुढीलप्रमाणे आहे.

बकेट बँका जोखीम भारित अॅसेट्सची (आरडब्ल्यु) टक्केवारी म्हणून अतिरिक्त कॉमन इक्विटी टायर 1 आवश्यकता.
5 - 1.0%
4 - 0.8%
3 भारतीय स्टेट बँक 0.6%
2 - 0.4%
1 आयसीआयसीआय बँक 0.2%

पार्श्वभूमी

रिझर्व बँकेने जुलै 22, 2014 रोजी डी-एसआयबीसाठी एक साचा दिला होता. 2015 पासून, दरवर्षी ऑगस्ट महिन्यात, रिझर्व बँकेद्वारे, डी-एसआयबी म्हणून नेमलेल्या बँकांची नावे प्रकट करणे डी-एसआयबी साचानुसार आवश्यक होते. त्यांच्या सिस्टमॅटिक इंपॉर्टन्स स्कोअर अनुसार (एसआयएस), डी-एसआयबींना चार बकेट्समध्ये ठेवले जाणेही, ह्या साच्यानुसार आवश्यक होते. डी-एसआयबी ज्यात ठेवली गेली आहे त्या बकेटवर अवलंबून, तिला अतिरिक्त कॉमन इक्विटी आवश्यकता लागु करावी लागते. ह्याशिवाय, डी-एसआयबी साचात निर्देशित केल्यानुसार, एखादी विदेशी बँक भारतात अस्तित्वात असल्यास ती ग्लोबल सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँक (जी-एसआयबी) होते. एक जी-एसआयबी म्हणून तिला भारतात लागु असलेला अतिरिक्त सीईटी-1 भांडवली सरचार्ज, भारतामधील तिच्या जोखीम भारित अॅसेट्सच्या प्रमाणात ठेवावा लागतो.

डी-एसआयबी मध्ये दिलेल्या रीतीनुसार व मार्च 31, 2015 रोजी गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर, रिझर्व बँकेने, भारतीय स्टेट बँक व आयसीआयसीआय बँक लि. ह्यांना, ऑगस्ट 31, 2015 रोजी डी-एसआयबी म्हणून प्रेषित केले आहे. डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपॉर्टंट बँक्स (डी-एसआयबी) चा साचा आणि मार्च 31, 2016 रोजी गोळा केलेली माहिती ह्यांच्या आधारावर, ह्या दोन बँकांना 2016 मध्येही डी-एसआयबी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/495

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä