Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/08/2016
रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना आरबीआयने दिलेल्या निदेशांना फेब्रुवारी 21, 2017 पर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 24, 2016

रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना आरबीआयने दिलेल्या
निदेशांना फेब्रुवारी 21, 2017 पर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 18, 2016 रोजी रुपी सहकारी बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निदेशांना, रिझर्व बँकेने, ऑगस्ट 22, 2016 पासून ते फेब्रुवारी 21, 2017 पर्यंत अशी सहा महिन्यांची मुदतवाढ, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर दिली आहे. हे निदेश सुरुवातीला फेब्रुवारी 22, 2013 पासून ऑगस्ट 21, 2013 पर्यंत देण्यात आले होते व त्यांना प्रत्येकी सहा महिन्यांसाठी पाच वेळा, तसेच प्रत्येकी तीन महिन्यांसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सर्वात शेवटची मुदतवाढ, फेब्रुवारी 22, 2016 ते ऑगस्ट 21, 2016 अशी सहा महिन्यांसाठी होती.

बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निदेश जारी केले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निदेशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निदेशांचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व बँकेने रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, निर्बंधांसह नेहमीचे बँक व्यवहार करणे सुरुच ठेवील. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/485

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä