इंदापुर नागरी सहकारी बँक लि., इंदापुर, जिल्हा : पुणे ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड आकारणी |
ऑगस्ट 16, 2016
इंदापुर नागरी सहकारी बँक लि., इंदापुर, जिल्हा : पुणे ह्यांच्यावर आरबीआयकडून दंड आकारणी
बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ(1)(ब) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, इंदापुर नागरी सहकारी बँक लि., इंदापुर, जिल्हा पुणे ह्यांना रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला आहे. हा दंड, कर्जे व अग्रिम राशींवरील क्रेडिट एक्सपोझर नॉर्म्स व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी)/अँटीमनी लॉडरिंग (एएमएल) ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे.
रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर देऊन मौखिक सादरीकरणही केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँक ह्या निष्कर्षावर आली की उल्लंघने निश्चितपणे झाली असून दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/418 |
|