Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (330.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 05/09/2016
डॉ.उर्जित पटेल ह्यांच्या कडून आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा स्वीकार

सप्टेंबर 05, 2016

डॉ.उर्जित पटेल ह्यांच्या कडून आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा स्वीकार

जानेवारी 2013 पासून रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्य करणारे डॉ.उर्जित पटेल ह्यांना, सप्टेंबर 04, 2016 पासून भारतीय रिझर्व बँकेचे चोविसावे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकरण्यास सांगण्यात आले. डेप्युटी गव्हर्नर म्हणून तीन वर्षाच्या मुदतीसाठी प्रथम काम केल्यानंतर त्यांची, त्याच पदावर डेप्युटी गव्हर्नर म्हणून जानेवारी 11, 2016 पासून पुनर् नेमणुक केली गेली होती. डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांच्यावर सोपविलेल्या कार्यापैकी डॉ. पटेल ह्यांनी, नाणेविषयक धोरणाचा साचा सुधारित व बळकट करण्यासाठीच्या तज्ञ समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते. भारताचे प्रतिनिधित्व करत असतांना, डॉ. पटेल ह्यांनी ब्रिक्स राष्ट्रांमध्ये आंतर सरकार करार आणि आंतर केंद्रीय बँक करारावर (आयसीबीए) सह्या केल्या जाण्यासाठी जोरात प्रयत्न केले होते. आणि त्यामुळेच, ह्या देशांच्या केंद्रीय बँकांमध्ये एक स्वॅपलाईन फ्रेमवर्क म्हणता येईल अशी काँटिजंट रिझर्व अरेंजमेंट (सीआरए) स्थापन केली गेली.

डॉ. पटेल ह्यांनी आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) मध्येही काम केले आहे. 1996-1997 मध्ये, भारतीय रिझर्व बँकेमध्ये आयएमएफचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणुक केली गेली होती. आणि त्या क्षमतेमध्ये त्यांनी, कर्ज बाजाराचा विकास, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, पेन्शन निधीमधील सुधारणा आणि विदेशी मुद्रा मार्केटचा विकास ह्यावर सल्लाही दिला होता. 1998 ते 2001 पर्यंत ते भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे(आर्थिक बाबी विभाग) सल्लागार होते. सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातही त्यांच्यावर इतर कार्ये सोपविण्यात आली होती.

डॉ. पटेल ह्यांनी, अनेक केंद्रीय व राज्य सरकारांच्या उच्च स्तरावरील समितींमध्येही खूप सक्रियतेते काम केले आहे. त्यातील काही म्हणजे, थेट करांवरील कृतीदल (केळकर समिती), नागरी व संरक्षण दलांच्या पेन्शन प्रणालीचे पुनरावलोकन करण्यासाठी असलेली उच्च स्तरीय समिती, पायाभूत सोयींवरील, प्रधान मंत्र्यांचे कृतीदल, टेलिकॉमच्या बाबींवरील मंत्री गट, नागरी विमानसेवेतील सुधारणांवरील समिती आणि ऊर्जा मंत्रालयाच्या, राज्य वीज मंडळावरील तज्ञ गट.

डॉ. पटेल ह्यांची, भारतीय मॅक्रोइकॉनॉमिक्स, नाणेविषयक धोरण, सार्वजनिक वित्तसहाय्य, भारतीय आर्थिक क्षेत्र, आणि विनियामक अर्थशास्त्र ह्या क्षेत्रात अनेक प्रकाशने/लेख प्रकाशित झाले आहेत.

डॉ. पटेल ह्यांनी येल युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रामधील पीएचडी घेतली असून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून एमफील व लंडन युनिव्हर्सिटीमधून बीएससी ही पदवी घेतली आहे.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/590

डॉ.उर्जित पटेल ह्यांनी, सप्टेंबर 06, 2016 पासून भारतीय रिझर्व बँकेचे चोविसावे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकरला आहे : छायाचित्र

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä