सप्टेंबर 15, 2016
‘आर’ हे इनसेट अक्षर, अंक–फलकामध्ये वाढत्या आकराचे अंक आणि इंटाग्लिओ छपाई नसलेल्या
रु 20 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकामध्ये ‘आर’ हे इनसेट अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या आणि मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष छापलेल्या, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, रु20 मूल्याच्या बँक नोटा वितरित करणार आहे.
पुढील बाबी सोडल्यास, आता वितरित केल्या जाणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन व सुरक्षा लक्षणे, ह्यापूर्वी, महात्मा गांधी मालिका-2005 मध्ये दिल्या गेलेल्या रु20 च्या बँकनोटांप्रमाणेच असेल.
पुढील बाजू:
वाढत्या आकाराचे अंक
ह्या नोटेच्या दोन्हीही अंक फलकांमधील अंक, डावीकडून उअजवीकडे वाढत्या आकाराचे असतील, तर सुरुवातीची पहिली तीन न्युमरिक चिन्हे (प्रिफिक्स) एकाच आकाराची असतील.
इंटाग्लिओ छपाई :
आतापर्यंत इंटाग्लिओ (म्हणजे वर आलेली) प्रकारे छापलेला “20” हा अंक, महात्मा गांधींचे चित्र, आरबीआय अक्षर समुह, गॅरंटी व प्रॉमिस क्लॉज, गव्हर्नरांची सही, अशोक स्तंभाचे चिन्ह, हे आता ऑफसेट प्रकारे (म्हणजे वर न आलेली) छापले जाणार आहे. ह्याशिवाय, ह्या बँक नोटेच्या डाव्याबाजूस असलेले आयताकार ओळख-चिन्हही काढून टाकण्यात आले आहे.
रंग :
मागील बाजूवरील रंगामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसला तरी, पुढील बाजूवरील रंग थोडा हलका असेल (इंटाग्लिओ छपाई काढून टाकल्यामुळे)
छुपी प्रतिमा
महात्मा गांधींच्या चित्राच्या उजवीकडे असलेल्या उभ्या पट्ट्यांमध्ये, आतापर्यंत. “20” हा मूल्य-अंक दर्शविणारी एक सुप्त प्रतिमा ठेवण्यात आली होती.
अगदी डोळ्यासमोर नोट आडवी धरुन पाहिल्यासच ही सुप्त प्रतिमा दिसू शकत होती. हे लक्षणही आता काढून टाकण्यात आले आहे.
मागील बाजू
नोटेच्या मागील बाजूस कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ह्या बँक नोटेच्या नमुन्याची प्रतिमा पुढील प्रमाणे आहे.
ह्या बँकेने ह्यापूर्वी वितरित केलेल्या रु 20 मूल्याच्या बँक नोटा एक वैध चलन म्हणून असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/678 |