सप्टेंबर 26, 2016
दि नीड्स ऑफ लाईफ सहकारी बँक लि., मुंबई ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु
बँकिंग विनियम अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या, कलम 46(4) सह वाचित, कलम 47 अ(1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, दि नीड्स ऑफ लाईफ सहकारी बँक लि., फोर्ट, मुंबई ह्यांना रु.5.00 लाख (रुपये पाच लाख) दंड लावला आहे व तो दंड, तिच्या सभासदांनी अटीनुसार असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त भरणा भाग भांडवल धारण करणे, ह्याबाबतच्या रिझर्व बँकेचे निदेश/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणे, अप्रतिभूतित ओव्हरड्राफ्ट सुविधांवरील आणि अप्रतिभूतित अग्रिम राशींवरील मर्यादांचे उल्लंघन करणे, आणि केवायसी निकषांचे पालन न करणे (उदा. केवायसी कागदपत्रे अद्यावत न करणे, युनिक कस्टमर आयडेंटिफिकेशन कोड (युसीआयसी) न देणे, परिणामकारक अशी ओळख पटविण्याची व एफआययु-आयएनडी ह्यांना शंकास्पद व्यवहार कळविण्याची प्रणाली न ठेवणे ह्यासाठी लावण्यात आला होता.
रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर देऊन तोंडी सादरीकरणही केले होते. ह्या प्रकरणातील सत्यता व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की वरील उल्लंघने सिध्द झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/769 |