सप्टेंबर 22, 2016
सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17 मालिका 2
भारतीय रिझर्व बँकेने, भारत सरकारशी सल्लामसलत करुन, परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.462/14.04.050/2016-17 आणि परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.463/14.04.050/2016-17. अन्वये सार्वभौम सुवर्ण रोखे 2016-17 मालिका 2 देण्याबाबत अधिसूचित केले होते. सार्वभौम सुवर्ण रोख्यांचा पाचवा टप्पा, सप्टेंबर 1, 2016 ते सप्टेंबर 09, 2016 ह्या दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. हे रोखे सप्टेंबर 23, 2016 रोजी दिले जाणार होते.
बँका व पोस्ट ऑफिसांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज आले होते. हे अर्ज, आरबीआयच्या ई-कुबरे प्रणालीत सुरळितपणे अपलोड करण्यासाठी (विशेषतः पोस्ट ऑफिसांद्वारे), सार्वभौम सुवर्ण रोखे देण्याची तारीख सप्टेंबर 23, 2016, सप्टेंबर 30, 2016 करण्याचे ठरविण्यात आले आहे.
वरील परिपत्रकांमधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/740 |