सप्टेंबर 23, 2016
इनसेट अक्षर नसलेल्या, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या आणि इंटालिओ छपाई नसलेल्या
रु.50 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, दोन्हीही अंक फलकांमध्ये इनसेट अक्षर नसलेल्या व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष असलेल्या रु.50 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे.
ह्या नोटांचे डिझाईन व सुरक्षा लक्षणे, पुढील गोष्टी सोडल्यास आधी दिलेल्या महात्मा गांधी मालिका-2005 मधील, दोन्हीही अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या रु.50 च्या बँक नोटांप्रमाणेच असतील.
मागील बाजू
इंटाग्लिओ छपाई
‘50’ हा अंक, आरबीआय सील, महात्मा गांधीचे चित्र, आरबीआय लीजंड, गॅरंटी व प्रॉमिज क्लॉज, गव्हर्नरांची सही, अशोक स्तंभ चिन्ह हे पूर्वी इंटाग्लिओ छपाईत (वर आलेली/उंचावलेली म्हणजे रेज्ड छपाई) केले जात असे ते आता ऑफसेट छपाईने (वर न आलेली/ न उंचावलेली छपाई) करण्यात आले आहे. ह्याशिवाय बँक नोटेच्या डावीकडे असलेले ओळख चिन्ह काढून टाकण्यात आले आहे.
रंग
मागील बाजूवरील रंगामध्ये कोणताही बदल केला नसला, तरी मागील बाजूवरील रंग (इंटाग्लिओ छपाई काढून टाकण्यात आली असल्याने) फिकट आहे.
सुप्त प्रतिमा
महात्मा गांधीच्या उजव्या बाजूस असलेल्या उभ्या पट्ट्यात, पूर्वी मूल्य दर्शविणा-या ‘50’ ह्या अंकाची सुप्त प्रतिमा होती. ही सुप्त प्रतिमा, बँक नोट डोळ्यासमोर आडवी धरुन पाहिल्यासच दिसत असे. हे लक्षण आता काढून टाकण्यात आले आहे.
मागील बाजू
बँक नोटेच्या मागील बाजूमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
ह्या नोटेच्या नमुन्याची प्रतिमा खाली दिली आहे.
ह्या बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.50 च्या बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/751 |