सप्टेंबर 23, 2016
इनसेट अक्षर नसलेल्या, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या आणि
इंटालिओ छपाई नसलेल्या
रु.20 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, दोन्हीही अंक फलकांमध्ये इनसेट अक्षर नसलेल्या व रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या रु.20 मूल्याच्या बँक नोटा प्रसृत करणार आहे.
आता दिल्या जाणा-या ह्या बँक नोटांची सुरक्षा लक्षणे, महात्मा गांधी मालिका-2005 मधील, अंक फलकांमध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या, इंटालिओ छपाई नसलेल्या, सुप्त प्रतिमा नसलेल्या व ओळख चिन्ह नसलेल्या, रु.20 च्या बँक नोटांप्रमाणेच असतील. ह्या नोटांच्या मागील बाजूवर असलेला रंग इटालिओ छपाई नसल्याने थोडा फिकट असेल (संदर्भ : वृत्तपत्रासाठी निवेदन क्र.2016-2017/678 दिनांक सप्टेंबर 15, 2016).
ह्या बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.20 च्या बँक नोटा, एक वैध चलन असणे सुरुच राहील
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/757 |