ऑक्टोबर 03, 2016
श्री साई अर्बन सहकारी बँक लि., मुखेड, जिल्हा नांदेड, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या सूचनांना आरबीआयद्वारे डिसेंबर 31, 2016 पर्यंत मुदतवाढ
श्री साई अर्बन सहकारी बँक लि., जिल्हा नांदेड (महाराष्ट्र) ह्यांना, सप्टेंबर 30, 2016 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून देण्यात आलेल्या निदेशांना, आरबीआयने पुनरावलोकनाच्या अटीवर, तीन महिन्यांसाठी म्हणजे डिसेंबर 31, 2016 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वरील बँक जुलै 01, 2015 पासून निदेशांखाली होती. ह्यापूर्वीही वरील निदेशांना दोन वेळा नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने वरील निदेश जारी केले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी, वरील निदेशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
रिझर्व बँकेने निदेश जारी केले ह्याचा अर्थ, तिने वरील बँकेचा बँक परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ही बँक निर्बधांसह तिचे बँकिंग व्यवहार करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीनुसार, वरील निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/840
|