Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (62.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 05/10/2016
मर्कंटाईल अर्बन सहकारी बँक लि., मिरत, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेला आरबीआयद्वारे मुदतवाढ

ऑक्टोबर 05, 2016

मर्कंटाईल अर्बन सहकारी बँक लि., मिरत, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांच्या वैधतेला आरबीआयद्वारे मुदतवाढ

मर्कंटाईल अर्बन सहकारी बँक लि., मिरत ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), ऑक्टोबर 06, 2016 पासून ते एप्रिल 05, 2017 पर्यंत अशी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली दिलेल्या, सप्टेंबर 30, 2015 च्या निदेशान्वये ही बँक, ऑक्टोबर 06, 2015 पासून निदेशाखाली होती.

आरबीआयचे निदेश दि. मार्च 29, 2016 अन्वये वरील निदेश सुधारित करण्यात आले/त्याची वैधता वाढविण्यात आली. सगळ्यात शेवटी ऑक्टोबर 5, 2016 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेल्या ह्या निदेशाची वैधता, सप्टेंबर 30, 2016 च्या निदेशान्वये, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे ऑक्टोबर 6, 2016 ते एप्रिल 5, 2017 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आली. संदर्भित निदेशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. सप्टेंबर 30, 2016 रोजीच्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने निदेश सुधारित केला ह्याचा अर्थ, ह्या बँकेच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा किंवा -हास झाला आहे असा घेण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशात सुधारणा/बदल करण्याचा विचार आरबीआय करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/863

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä