ऑक्टोबर 05, 2016
गोकुळ सहकारी अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआय द्वारा एप्रिल 4, 2017 पर्यंत मुदतवाढ
जनतेच्या हितासाठी, गोकुळ सहकारी अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांची वैधता आणखी सहा महिने वाढविणे आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले असल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35अ च्या पोटकलम (1) ने तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने निदेश दिले आहेत की, गोकुळ सहकारी अर्बन बँक लि., सिकंदराबाद ह्यांना एप्रिल 4, 2016 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून दिलेले निदेश, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे एप्रिल 4, 2017 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असणे सुरुच राहील.
संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
सप्टेंबर 30, 2016 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/865
|