ऑक्टोबर 14, 2016
युनायटेड इंडिया सहकारी बँक लि., नगीना, बिजनोर, उत्तर प्रदेश ह्यांना आरबीआयद्वारा सूचना - सूचना मागे घेणे.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली, जुलै 8, 2015 च्या निदेशान्वये, रिझर्व बँकेने, युनायटेड इंडिया सहकारी बँक लि., नगीना, बिजनोर ह्यांना सूचना दिल्या होत्या. ह्या सूचनांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. असे शेवटचे निदेश दि. मार्च 30, 2016 हे, ऑक्टोबर 14, 2016 पर्यंत वैध आहेत.
जनहिताच्या दृष्टीने असे करणे आवश्यक असल्याबाबत समाधान झाल्याने, भारतीय रिझर्व बँक, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 56 सह वाचित कलम 35अ च्या पोटकलम (2) खाली तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन, येथे, युनायटेड इंडिया सहकारी बँक लि. नगीना, बिजनोर, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या सूचना, ऑक्टोबर 15, 2016 पासून मागे घेत आहे.
ह्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे. ह्यानंतर ही बँक तिचे नियमित बँकिंग व्यवहार करणे सुरुच ठेवील.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/929
|