ऑक्टोबर 18, 2016
एनसीएफईच्या एनएफएलएटीसाठी (राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी)
पंजीकरण खुले वित्तीय शिक्षणासाठीचे राष्ट्रीय केंद्राच्या (एनसीएफई), राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी (एनएफएलएटी) साठी पंजीकरण करणे ऑक्टोबर 15, 2016 पासून सुरु झाले आहे. सिक्युरिटीज मार्केट्स साठीची राष्ट्रीय संस्था (एनआयएसएम) नवी मुंबई ह्यांनी, इयता 6 वी ते 10 वी पर्यंतचा शालेय विद्यार्थ्यांना, राष्ट्रीय वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी (एनसीएफई- एनएफएलएटी 2016-17) मध्ये भाग घेण्यास आमंत्रित केले आहे.
ही चाचणी, ऑनलाईन (पुरेशा आयटी सोयी व इंटरनेट जोडणी असलेल्या शाळेत) आणि ऑफलाईन (शाळेत पेन व पेपर सह शाळेमध्ये) घेतली जाईल. ही चाचणी दोन वर्गात म्हणजे, एनएफएलएटी ज्युनियर (इयत्ता 6 वी ते 8 वी) आणि एनएफएलएटी (इयत्ता 9 वी व 10 वी) घेतली जाईल.
शाळांनी त्यांचे पंजीकरण ऑनलाईन करावयाचे आहे. शाळेचे पंजीकरण झाल्यानंतर, संबंधित शाळांद्वारे विद्यार्थ्यांचे पंजीकरण केले जाईल. ऑनलाईन/ऑफलाईन चाचणीचा पर्याय शाळांना देण्यात येईल. शाळांनाच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन/ऑफलाईन चाचणी दरम्यान पर्यवेक्षण करावे लागेल. ऑनलाईन/ऑफलाईन चाचणीसाठी मदत लागल्यास ती एनसीएफई/एनआयएसएम टीम द्वारे दिली जाईल.
http://www.ncfeindia.org/nflat ह्या एनसीएफई वेबसाईटवरील लिंकचा वापर करुन शाळा त्यांची नोंदणी करु शकतात.
महत्वाच्या तारखा : |
|
ऑनलाईन चाचणी |
ऑफलाईन चाचणी |
पंजीकरणाची सुरुवात |
ऑक्टोबर 15, 2016 |
ऑक्टोबर 15, 2016 |
पंजीकरण बंद |
नोव्हेंबर 22, 2016 |
नोव्हेंबर 22, 2016 |
पहिला स्तर - परीक्षेची तारीख |
नोव्हेंबर 25, 2016 - जानेवारी 7, 2017* |
डिसेंबर 1, 2016- डिसेंबर 10, 2016** |
दुसरा स्तर- प्रादेशिक व राष्ट्रीय स्पर्धा |
फेब्रुवारी 1, 2017 ते फेब्रुवारी 28, 2017 |
* पुरेशा आयटी सोयी व इंटरनेट जोडणी असलेल्या संबंधित शाळांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ** पेन व कागद ह्यांचा वापर करुन संबंधित शाळेत ऑफलाईन चाचणी घेतली जाईल. |
एनएफएलएटी व एनएफएलएटी ज्युनियर चाचणी साठीचा कालावधी 60 मिनिटे असेल आणि त्यात अनुक्रमे 75 व 50 प्रश्न असतील. ही चाचणी इंग्रजी व हिंदी अशा दोन्हीही भाषेत घेतली जाईल. अभ्यासक्रमाचा तपशील एनसीएफईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
बक्षिसे
राष्ट्रीय स्तरावरील शालेय विजेत्यांना (पहिल्या तीन क्रमांकाच्या शाळा) प्रत्येकी रु.35,000/- रोख व एक ढाल (शिल्ड) दिली जाईल व शाळेच्या राष्ट्रीय विद्यार्थी विजेत्यांचा (जोडी 1 + 1) प्रमाणपत्रे, पदके व लॅपटॉप देऊन सत्कार केला जाईल.
प्रादेशिक शालेय विजेत्यांना (प्रत्येक झोनमधील सर्वप्रथम 3 शाळा) प्रत्येकी रु.25,000/- रोख व एक ढाल दिली जाईल आणि विजेत्या प्रादेशिक विद्यार्थ्यांचा (जोडी 1 + 1) प्रमाणपत्रे, पदके व टॅबलेट्स/किंडल्स देऊन सत्कार केला जाईल.
अधिक माहिती पुढील ठिकाणावरुन मिळविता येईल :
सिक्युरिटीज मार्केट्सची राष्ट्रीय संस्था, एनआयएसएम भवन, प्लॉट नं. 82, सेक्टर-17, वाशी, नवी मुंबई-400 703, फोन - 022-66734600-02, ई-मेल nflat@nism.ac.in, वेबसाईट www.ncfeindia.org | www.nism.ac.in
पार्श्वभूमी
सिक्युरिटीज मार्केट्स साठीची राष्ट्रीय संस्था (एनआयएसएम) ही, वित्तीय शिक्षणासाठीची राष्ट्रीय कृतीयोजनेची अंमलबजावणी करणारी नोडल एजन्सी म्हणून समजली गेली आहे. ह्या बाबतीत, एनआयएसएमने, भारतामधील सर्व वित्तीय क्षेत्र नियंत्रक, भारतीय रिझर्व बँक (आरबीआय), सिक्युरिटीज अँड डेवलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी (पीएफआरडीए) ह्यांच्या पाठिंब्याने भारतामध्ये वित्तीय साक्षरता व समावेशन ह्यांचा विकास करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन (एनसीएफई) स्थापन केली आहे.
एनसीएफईची वित्तीय साक्षरता मूल्यमापन चाचणी (एनसीएफई - एनएफएलएटी) ही ह्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. राष्ट्रीय स्तरावरील एक चाचणी घेऊन, शालेय विद्यार्थ्यांना (इयत्ता 6 ते 10) वित्तीय संकल्पना जाणण्यासाठी चालना देऊन त्यांची वित्तसंबंधीच्या जाणीवेचे मोजमाप करण्याची एनसीएफईची ही योजना आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये बालपणीच महत्वाची जीवन कौशल्ये विकसित होऊन, त्यानंतरच्या जीवनात ते सशक्त वित्तीय निर्णय घेऊ शकतील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/956
|