Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (61.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/10/2016
क्रेडिट अॅग्रिकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) ह्यांचेवर आरबीआय द्वारा दंड लागु

ऑक्टोबर 20, 2016

क्रेडिट अॅग्रिकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया)
ह्यांचेवर आरबीआय द्वारा दंड लागु.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4)(1) सह वाचित, कलम 47 (अ)(1)(क) खाली तिला मिळालेल्या अधिकारांचा वापर करुन, रिझर्व बँकेने, क्रेडिट अॅग्रीकोल कॉर्पोरेट अँड इनवेस्टमेंट बँक (इंडिया) ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 6 च्या तरतुदीचे उल्लंघन केल्यासाठी रु. 10 दशलक्ष (रुपये दहा दशलक्ष) दंड लागु केला आहे.

ही बँक तिच्या, क्रेडिट अॅग्रीकोल सीआयबी सर्व्हिसेस प्रा. लि. ह्या आऊटसोर्सिंग एजन्सीला अनेक सेवा देऊन तिच्याकडून शुल्क मिळवत होती. बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या कलम 6(1) खाली ह्या कार्यकृतींना परवानगी नसल्याने वरील बँकेला, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 6 चे उल्लंघन केले असल्याची एक कारणे दाखवा नोटिस पाठविण्यात आली होती.

बँकेने दिलेले उत्तर व्यक्तिगत सादरीकरणे व रेकॉर्डवर उपलब्ध असलेले कागदपत्र विचारात घेतल्यानंतर रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन सिध्द झाले असून दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/979

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä