ऑक्टोबर 19, 2016
दि तुमकुर वीरशैव सहकारी बँक लि., तुमकुर, कर्नाटक
ह्यांचेवर आरबीआयद्वारा दंड लागु.
तुमकुर वीरशैव सहकारी बँक लि., तुमकुर, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयने बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ (1)(ब) च्या तरतुदींनी तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, रु. 10.00 लाख (रुपये दहा लाख) दंड लागु केला असून, हा दंड, एप्रिल 11, 2005 च्या परिपत्रकातील रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे/मार्गदर्शक तत्वांचे (मागील वर्षामधील नफ्याच्या 1% पेक्षा अधिक देणगी देण्यास मनाई) आणि जुलै 1, 2015 च्या केवायसी/एएमएल वरील महापरिपत्रकाच्या उपखंड (4) (ड) 3.2.2-1 (ब) चे (व्यक्ती सोडून अन्य खाती उघडतांना ग्राहकांबाबत योग्य परिश्रम घेणे वरील) उल्लंघन केल्याबद्दल लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की, उल्लंघने झाली असून दंड करणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/971 |