आरबीआयकडून नवी दिल्ली मध्ये बँकिंग लोकपालाच्या दुस-या कार्यालयाचे उद्घाटन |
नोव्हेंबर 01, 2016
आरबीआयकडून नवी दिल्ली मध्ये बँकिंग लोकपालाच्या दुस-या कार्यालयाचे उद्घाटन अलिकडील भूतकाळातील बँकिंग नेटवर्क मध्ये झालेला लक्षणीय विस्तार आणि नवी दिल्ली मधील बँकिंग लोकपालाच्या विद्यमान कार्यालयाचे वाढलेले कार्यक्षेत्र विचारात घेऊन, भारतीय रिझर्व बँकेने, भारतीय रिझर्व बँक नवी दिल्ली येथे बँकिंग लोकपालाचे दुसरे कार्यालय उघडले आहे.
भारतीय रिझर्व बँक नवी दिल्ली येथील बँकिंग लोकपालाच्या पहिले कार्यालयाचे अधिकार क्षेत्र, दिल्ली आणि जम्मू व काश्मिर असेल, तर भारतीय रिझर्व बँक नवी दिल्ली येथील बँकिंग लोकपालाच्या दुस-या कार्यालयाचे अधिकार क्षेत्र हरयाणा (पंचकुला, यमुनानगर व अंबाला जिल्हे सोडून) आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद व गौतम बुध्द नगर जिल्हे असेल.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1079
|
|