नोव्हेंबर 08, 2016
रु ५०० आणि रु १००० मूल्य वर्गाचे वैध चलन मागे घेण्याबाबत- आरबीआई ची सूचना
भारत सरकार ने आपल्या ०८ नोव्हेंबर २०१६ च्या अधिसूचना सं.२६५२ द्वारे भारतीय रिझर्व बॅंके द्वारा ०८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत जारी केलेल्या महात्मा गांधी श्रृंखलेतील ५०० रु आणि १००० रु च्या मूल्यवर्गाच्या बैंक नोटांची वैध चलन स्थिती मागे घेतली आहे.
भारतीय बैंक नोटांचे बनावटीकरण रोखणे, रोख जमा काळे धन प्रभावीपणे अमान्य करणे व नकली नोटांसह दहशतवाद्यांच्या वित्त पोषणावर अंकुश लावण्यासाठी हे आवश्यक आहे.
१० नोव्हेंबर २०१६ पासून सार्वजनिक/कार्पोरेटस्, व्यवसाय फर्म, सोसायटी, ट्रस्ट इत्यादि या नोटांना भारतीय रिझर्व बॅंकेच्या कोणत्याही कार्यालयात अथवा कोणत्याही बॅंकेच्या शाखेमध्ये जमा करु शकतात तसेच त्यांच्या संबंधीत बॅंक खात्यात क्रेडिट मार्फत त्याचे मूल्य प्राप्त करु शकतात.
रोख रकमेच्या तत्काळ गरजेसाठी प्रति व्यक्ति ४००० रु मूल्यांच्या नोटा बॅंक शाखांच्या काउंटरवर देऊन त्याबदल्यात रोख रकम प्राप्त करता येईल.
जनतेला सूचीत करण्यात येत आहे कि हया विनिमय सुविधेचा लाभ घेताना वैध ओळखपत्र सादर करावे.
त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम चेक मार्फत काढ़ता येवू शकते किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमें जसे एनईएफटी, आरटीजीएस, आईएमपीएस, मोबाइल बैंकिंग इत्यादि द्वारे ट्रांसफर केली जाऊ शकते. ०९ नोव्हेंबर २०१६ पासून ते २४ नोव्हेंबर २०१६ पर्यंत काउंटर वर खात्यामधून रोख रकम काढण्याची प्रतिदिन मर्यादा १०००० रु व दर आठवडयाला जास्तीत जास्त २०००० रु पर्यंत राहील. त्यानंतर या मर्यादेची समीक्षा केली जाईल.
सर्व एटीएम व इतर कॅश मशीन ०९ नोव्हेंबर २०१६ रोजी कॅलिब्रेशनसाठी बंद राहतील. तयार झाल्यावर मशीन्स सक्रीय करण्यात येतील व १८ नोव्हेंबर २०१६ पर्यंत एटीएम मधून रक्कम काढण्याची मर्यादा दररोज प्रतिकार्ड २००० रु राहील. ही मर्यादा १९ नोव्हेंबर २०१६ पासून दररोज प्रतिकार्ड ४००० रु पर्यंत वाढविण्यात येईल.
३० डिसेंबर २०१६ पर्यंत आपल्या बॅंक खात्यात निर्दिष्ट बॅंक नोटा जमा करु न शकल्यास किंवा न बदलवु शकल्यास त्या व्यक्तींना हया किंवा इतर निर्दिष्ट सुविधा भारतीय रिझर्व बॅंकेच्या निर्दिष्ट कार्यालयामध्ये ठराविक तारखेपर्यंत उपलब्ध करुन देण्याची संधी दिली जाईल.
अधिक माहिती व विवरणासाठी भारतीय रिझर्व बॅंकेची वेबसाइट www.rbi.org.in आणि शासनाची वेबसाइट www.finmin.nic.in ला भेट द्यावी.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन: 2016-2017/1142 |