नोव्हेंबर 13, 2016
इनसेट अक्षर ‘एल’ असलेल्या व महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.500 च्या नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘एल’ हे अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागील बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष व स्वच्छ भारत लोगो असलेल्या, महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.500 च्या नोटा प्रसृत करील.
ह्या नवीन रु.500 च्या नोटा, पूर्वीच्या विहित बँक नोटांच्या (एसबीएन) मालिकेपेक्षा, रंग, आकार, विषय, सुरक्षा लक्षणांची जागा आणि डिझाईन ह्या बाबतीत निराळ्या आहेत. त्यांची मुख्य लक्षणे अशी आहेत.
तसेच ह्या बँक नोटेवर, दृष्टीबाधित व्यक्तींना मूल्य ओळखता यावे ह्यासाठीची लक्षणेही आहेत (महात्मा गांधींचे चित्र, अशोक स्तंभ चिन्ह, ब्लीड लाईन्स, उजवीकडे रु.500 ह्या अक्षरांसह वर्तुळ आणि ओळख चिन्ह).
वृत्तपत्र निवेदन क्र. 2016-2017/1146 दि. नोव्हेंबर 8, 2016 अन्वये दिल्या गेलेल्या बँक नोटाही वैध चलन असणे सुरुच राहील.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1196 |