रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत |
नोव्हेंबर 08, 2016
रु.2,000 च्या बँक नोटा प्रसृत
भारतीय रिझर्व बँक लवकरच, इनसेट लेटर नसलेल्या आणि रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या व बँक नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या महात्मा गांधी मालिका (नवी) मधील रु.2,000 मूल्याच्या नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नवीन नोटेच्या मागील बाजूवर, आंतर ग्रहीय अंतराळातील आपल्या देशाच्या प्रथम मोहिमेचे चिन्ह म्हणून मंगळ यानाचे चित्र छापले आहे. ह्या नोटांचा बेस कलर मॅजेंडा आहे. ह्या नोटेवर, सर्वसाधारण रंग योजनेशी मेळ असणारी इतरही डिझाईन्स, भूमितीय आकृती, दर्शनी व मागील अशा दोन्हीही बाजूंवर दिल्या आहेत.
ह्या नोटांची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे असतील.
दर्शनी (पुढील बाजू) |
कॉलम 2 - दर्शनी बाजू (समोरील) |
मागील बाजू |
(1) मूल्याच्या आकड्याचे (2000) आरपार मुद्रण. |
(9) अशोक स्तंभाचे चिन्ह महात्मा गांधींच्या चित्राच्या व इलेक्ट्रोटाईप (2000) च्या उजवीकडे आहे. |
(13) नोटेच्या छपाईचे वर्ष नोटेच्या डाव्या बाजूस छापले आहे. |
(2) 2000 ह्या मूल्य अंकाची लपलेली प्रतिमा |
(10) वरच्या बाजूस डावीकडे व खालच्या बाजूस उजवीकडे असलेल्या अंक फलकामधील अंक लहान ते मोठे असे वाढत्या आकाराचे आहेत. |
(14) घोषवाक्यासह स्वच्छ भारत लोगो |
(3) मूल्याचा आकडा देवनागरी मध्ये |
दृष्टीबाधित व्यक्तींसाठी महात्मा गांधींचे चित्र, अशोक स्तंभाचे चिन्ह, ब्लीड लाईन्स व ओळख चिन्ह हे इंटाग्लिओ छपाईत म्हणजे वर उचललेल्या छपाईत आहेत. |
(15) भाषा फलक मध्यभागी |
(4) मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र |
(11) उजव्या बाजूवर रु.2000 ह्या अक्षरांसह एक आड व आयत वर उचललेल्या छपाईत आहे. |
(16) मंगळयानाचे चित्र |
(5) बँकेच्या डाव्या बाजूस आरबीआय व 2000 सूक्ष्म आकारात |
(12) डाव्या व उजव्या बाजूस सात ब्लीड लाईन्स वर उचललेल्या छपाईत आहेत. |
(17) मूल्याचा अंक 2000 देवनागरीमध्ये. |
(6) खिडक्या असलेला व भारत ही अक्षरे असलेला सुरक्षा धागा. बँक नोटेवरील आरबीआय आणि 2000 ही बदलत्या रंगात आहेत. नोट तिरपी धरुन पाहिल्यास, धाग्याचा रंग हिरव्या ऐवजी निळा दिसतो. |
|
|
(7) गॅरंटीचा मसुदा, बचत-कलमासह असलेली गव्हर्नरांची सही आणि आरबीआयचे चिन्ह उजवीकडे आहे. |
|
नोटेचा आकार 66 मीमी x 166 मीमी असेल. |
(8) मूल्य दर्शक रु.2000 हे चिन्ह हे उजवीकडे खालच्या बाजूस रंग बदलणा-या शाईत (हिरवा ते निळा) छापले आहे. |
|
|
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1144 |
|