नोव्हेंबर 08, 2016
‘आर’ ह्या इनसेट अक्षरासह रु.2000 च्या नोटांचे वितरण
भारतीय रिझर्व बँक लवकरच, ‘आर’ हे इनसेट अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांची सही असलेल्या आणि नोटेच्या मागच्या बाजूवर ‘2016’ हे छपाईचे वर्ष असलेल्या, महात्मा गांधी मालिका (नवी) मधील, रु.2000 च्या नोटा प्रसृत करणार आहे.
आता दिल्या जाणा-या नोटांचे डिझाईन, वृत्तपत्र निवेदन क्र. 1144 दि. नोव्हेंबर 8, 2016 द्वारा अधिसूचित केलेल्या, महात्मा गांधी मालिके (नवी) मधील रु.2000 च्या बँक नोटाप्रमाणेच असेल.
वृत्तपत्र निवेदन क्र. 1144 दि. नोव्हेंबर 8, 2016 अन्वये ह्या आधी दिल्या गेलेल्या नोटाही, वैध चलन असणे सुरुच राहील.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1145 |