नोव्हेंबर 11, 2016
पुरेशी रोकड उपलब्ध आहे - आरबीआयचे आश्वासन. धीर धरण्यासाठी व सोयीनुसार नोटा
बदलण्यासाठी जनतेला आवाहन
आज दिलेल्या एका निवेदनात, भारतीय रिझर्व बँकेने सांगितले आहे की, रु.500 व रु.1000 च्या विद्यमान नोटांचा वैध चलन असल्याचा गुणविशेष काढून टाकल्यानंतर, तिने रु.2000 च्या नवीन व इतर मूल्याच्या नोटांचे वाटप देशभरात करण्याची व्यवस्था केली आहे.
बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध असून देशभरात चलनी नोटा पोहोचविण्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर 10, 2016 पासून बँक शाखांनीही नोटा बदलून देण्याचे काम सुरु केले आहे.
आरबीआयने दिलेल्या संदेशात निर्देशित केल्याप्रमाणे, एटीएम मशीन्स रि-कॅलिबरेट करण्यास बँकांना काही काळ लागु शकतो. एकदा ही एटीएम काम करु लागल्यावर, नोव्हेंबर 18, 2016 पर्यंत लोक ह्या एटीएम मधून प्रतिदिन प्रति व्यक्ती कमाल रु.2,000 आणि त्यानंतर प्रतिदिन प्रतिकार्ड रु.4,000 काढू शकतील. आज सकाळपासून अनेक एटीएम कार्यरत झाली आहेत, कारण सुरुवातीला रु.2,000 पर्यंतची निकासी करण्यासाठी बँकांनी ह्या मशीन्सचे रि-कॅलिबरेशन पूर्ण केले आहे.
चलनातून बाद केलेल्या रु.500 व रु.1000 च्या नोटा बदलून देण्याची सुविधा जवळजवळ 50 दिवसांसाठी उपलब्ध आहे. भारतीय रिझर्व बँक जनतेला आवाहन, धीर धरण्याचे आवाहन करत आहे आणि जनतेकडील जुन्या नोटा डिसेंबर 30, 2016 पूर्वी बदलून घेण्याची तिला विनंती करत आहे.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1182 |