नोव्हेंबर 14, 2016
महात्मा गांधी मालिके (नवी) मधील बँक नोटांचे वितरण करण्यासाठी कृती-दलाची स्थापना -
एटीएम्सचे रिकॅलिब्रेशन व पुनर्चालन
महात्मा गांधी मालिके (नवी) मधील नव्या डिझाईनच्या नोटा तसेच उच्चतर मूल्याच्या (रु.2000) नवीन डिझाईनमधील बँक नोटांचे वितरण करण्यासाठी सर्व एटीएम्स/रोख रक्कम हाताळणारी मशीन्स रि-कॅलिब्रेट करणे आवश्यक झाले आहे.
(2) जनतेच्या चलन विषयक गरजा पूर्ण करण्यासाठी एटीएम्स महत्वाची भूमिका बजावतात व त्यामुळे रोख रक्कम देणारी ती एक मोठी वाहिनी ठरते. एटीएम्सचे पुनर्-चालन केल्यामुळे, बँकांच्या ग्राहकांना, उच्च व निम्न मूल्याच्या नोटा, योग्य सोयीच्या वेळी व ठिकाणी उपलब्ध होण्यात व मिळण्यात वाढ होते.
(3) एटीएम्सचे रि-कॅलिब्रेशन करण्यामध्ये अनेक घटकांचा सहभाग असतो - बँका, एटीएम उत्पादक, भारतीय राष्ट्रीय प्रदान निगम (एनपीसीआय) स्विच ऑपरेटर्स इत्यादि व त्याचबरोबर त्यात बहुविध कार्यकृतीही कराव्या लागत असल्याने वरील सर्व घटकांचा प्रचंड समन्वय लागत असल्याने, ते एक गुंतागुंतीचे काम असते.
(4) ह्या बाबतीत एक दिशा देण्यासाठी व मार्गदर्शन देण्यासाठी, श्री. एस एस मुंद्रा, डेप्युटी गव्हर्नर, भारतीय रिझर्व बँक ह्यांच्या अध्यक्षतेखाली एका कृती दलाची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले. ह्या कृतीदलात पुढील व्यक्तींचा समावेश असेल.
(1) भारत सरकार, वित्त मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग ह्यांचे प्रतिनिधी-सभासद
(2) भारत सरकार, वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग ह्यांचे प्रतिनिधी सभासद
(3) भारत सरकार, गृह व्यवहार मंत्रालय ह्यांचे प्रतिनिधी-सभासद
(4) सर्वात मोठे एटीएम नेटवर्क असलेल्या चार बँकांचे (भारतीय स्टेट बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक व एचडीएफसी बँक) प्रतिनिधी सभासद
(5) एनपीसीआय चा प्रतिनिधी-सभासद
(6) मुख्य महाव्यवस्थापक, चलन व्यवस्थापन विभाग - सभासद
(7) मुख्य महाव्यवस्थापक, प्रदान व तडजोड प्रणाली विभाग - सभासद सचिव म्हणून.
(5) एटीएम ऑफिस इक्विपमेंट उत्पादक (ओईएम), मॅनेज्ड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, कॅश इन ट्रांझिट (सीआयटी) कंपन्या आणि व्हाईट लेबल एटीएम (डब्ल्युएलए) ऑपरेटर्स ह्यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी ह्यांना ह्या कृतीदलाच्या मदतीसाठी आमंत्रित केले जाईल. तशीच आवश्यकता भासल्यास, कृतीदल इतरांनाही आमंत्रित करु शकेल.
(6) ह्या कृतीदलाची कार्ये पुढीलप्रमाणे असतील.
(1) सर्व एटीएम्सचे योजनाबध्द रितीने पुनर्-चालन करणे.
(2) वरील संदर्भात व संबंधित इतर कोणतीही बाब.
(7) डीपीएसएस, सीओ ह्याबाबत सचिवात्मक सेवा/आधार उपलब्ध करुन देईल
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1197 |