नोव्हेंबर 14, 2016
डीसीसीबी, त्यांच्या विद्यमान ग्राहकांना त्यांच्या खात्यांमधून रु.24,000 पर्यंत काढण्यास परवानगी देऊ शकतात : आरबीआय
भारतीय रिझर्व बँकेने आज स्पष्ट केले आहे की, जिल्हा केंद्रीय सहकारी बँका (डीसीसीबी), त्यांच्या विद्यमान ग्राहकांना, नोव्हेंबर 24, 2016 पर्यंत त्यांच्या खात्यांमधून रु.24,000 पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देऊ शकतात. तथापि, त्या बँकांनी, विहित बँक नोटांच्या (रु.500 व रु.1000) विरुध्द किंवा त्या जमा करण्याविरुध्द त्या बदलून देण्याची सुविधा देऊ नये. रिझर्व बँकेने, त्यानुसार, गरजेवर अवलंबून, डीसीसीबी द्वारे रु.24,000 पर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यातून काढण्यास परवानगी देण्यास सर्व बँकांना सांगितले आहे. मात्र प्रति सप्ताह रु.24,000 निकासीची ही मर्यादा, एखाद्या डीसीसीबीने दुस-या एखाद्या बँकेत असलेल्या तिच्या खात्यातून रोख रक्कम काढण्यास लागु नाही.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1198 |