साई नागरी सहकारी बँक लि., हडगाव ह्यांचा परवाना आरबीआयकडून रद्द |
नोव्हेंबर 17, 2016
साई नागरी सहकारी बँक लि., हडगाव ह्यांचा परवाना आरबीआयकडून रद्द
साई नागरी सहकारी बँक लि., हडगाव ह्यांना दिलेला परवाना, त्या बँकेचे, शंकर नागरी सहकारी बँक लि., नांदेड मध्ये विलीनीकरण झाल्याने ऑगस्ट 26, 2016 पासून आरबीआयने रद्द केला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) (एसीसीएस) च्या कलम 22 खाली भारतीय रिझर्व बँकेने ही कारवाई केली आहे.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1241 |
|