नोव्हेंबर 18, 2016
पॉईंट ऑफ सेल मध्ये (पीओएस) रोख निकासी -निकासीच्या मर्यादा व ग्राहक
शुल्क/आकार – शिथीलीकरण
नोव्हेंबर 14, 2016 रोजी भारतीय रिझर्व बँकेने बँकांना सूचना दिल्या होत्या की, नोव्हेंबर 10, 2016 ते डिसेंबर 30, 2016 पर्यंतच्या कालावधीत, त्या महिन्यातील व्यवहारांची संख्या कितीही असली तरी, बचत बँक खातेदारांकडून, सर्व एटीएम्सवर केलेल्या सर्व व्यवहारांवरील एटीएम आकार बँकांनी आकारु नयेत. ह्यासाठी पुनरावलोकनाची अट आहे.
आणखी एक ग्राहक-केंद्री उपाय म्हणून, पीओएसमधील रोकड निकासींची मर्यादा, ही सुविधा असलेल्या/देण्यात आलेल्या सर्व व्यापारी आस्थापनातील सर्व केंद्रांसाठी, (टायर 1 ते टायर 6) एकसमानतेने, रु.2000/- प्रतिदिन करण्यात आली आहे आणि (2) पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, अशा सर्व व्यवहारांवर आकारण्यात येणारे ग्राहक आकार डिसेंबर 30, 2016 पर्यंत रद्द करण्यात आले आहेत.
येथे स्मरण व्हावे की, भारतीय रिझर्व बँकेने तिचे परिपत्रक डीपीएसएस.सीओ.पीडी.क्र.449/02.14.003/2015-16 दिनांक ऑगस्ट 27, 2015 अन्वये, टायर 1 ते टायर 2 केंद्रामधील पॉईंट व सेल्समध्ये रु.1000/- व टायर 3 ते टायर 6 मध्ये रु.2000/- काढण्यास परवानगी दिली होती.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1255 |