नोव्हेंबर 20, 2016
रु.10 ची नाणीवैध चलन म्हणून स्वीकारणे जनता सुरु ठेवू शकते : आरबीआय
भारत सरकारने छापलेली/तयार केलेली नाणी रिझर्व बँक प्रसारात आणते. ह्या नाण्यांची विशेष लक्षणे आहेत. व्यवहार करतेवेळी असलेल्या जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीची नवीन मूल्यातील नाणी, आणि निरनिराळे विषय प्रदर्शित करणारी (आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक) नवीन डिझाईन मधील नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात. नाणी अधिक काळापर्यंत प्रसारात राहत असल्याने, एकाच वेळी, निरनिराळ्या डिझाईन्सची व आकाराचीही नाणी प्रसारात असणे शक्य असते. असाच एक बदल म्हणजे, जुलै 2011 मध्ये, नाण्यांमध्ये रुपयांचे चिन्ह टाकले जाणे, ह्याचेच एक उदाहरण म्हणजे रुपयाचे चिन्ह असलेले व त्याच मूल्याचे परंतु रुपये चिन्ह नसलेले रु.10 चे नाणे. ही दोन्हीही नाणी वैध चलने असून व्यवहारांसाठीही समानतेने योग्य आहेत, ती थोडी वेगळी दिसत असली तरी.
असे कळविण्यात आले आहे की, कमी माहिती असलेल्या किंवा अजिबात माहिती नसलेल्या व ह्या नाण्याच्या खरेपणाविषयी संशय असलेल्या काही व्यक्ती, व्यापारी, दुकानदार इत्यादींसह सामान्य लोकांमध्ये शंका निर्माण करत आहेत. त्यामुळे देशाच्या काही भागात ह्या नाण्यांच्या प्रसारात बाधा येत असून टाळता येण्यासारखा गोंधळही निर्माण होत आहे.
भारतीय रिझर्व बँकेकडून जनतेला सांगण्यात आले आहे की, त्यांनी अशा अर्धवट माहितीच्या कल्पनांवर विश्वास ठेवू नये तर त्याकडे दुर्लक्ष करुन कोणतीही हयगय न करता, त्यांच्या सर्व व्यवहारांमध्ये, एक वैध चलन म्हणून ती स्वीकारावीत.
ह्या नाण्यांच्या अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंक्स पहाव्यात:
https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx
जून 22, 2016 |
“स्वामी चिन्मयानंदांची जन्मशताब्दी” च्या स्मृतीप्रीत्यर्थ आरबीआय लवकरच रु.10/- ची नाणी प्रसृत करणार. |
जानेवारी 28, 2016 |
“डॉ. बी आर आंबेडकरांची 125 वी जयंती” च्या स्मरणार्थ रु.10/- ची नाणी प्रसृत. |
जुलै 30, 2015 |
“आंतरराष्ट्रीय योग दिन” च्या प्रीत्यर्थ रु.10/- ची नाणी प्रसृत. |
एप्रिल 16, 2015 |
“महात्मा गांधींच्या दक्षिण अफ्रिकेतून आगमनाच्या शताब्दी” स्मरणार्थ रु.10/- ची नाणी प्रसृत. |
जुलै 17, 2014 |
“कॉईर बोर्डच्या हरिक जयंती” प्रीत्यर्थ रु.10/- ची नाणी प्रसृत. |
ऑगस्ट 29, 2013 |
“माता वैष्णोदेवी साईन बोर्डाच्या रजत जयंती” निमित्त रु.10/- ची नाणी प्रसृत. |
जून 14, 2012 |
“भारतीय संसदेची 60 वर्षे” स्मरणार्थ रु.10/- ची नाणी. |
जुलै 22, 2011 |
नव्या मालिकेतील नाणी प्रसृत |
एप्रिल 01, 2010 |
पंतप्रधानांकडून स्मरणार्थ नाण्यांचा संच प्रसृत. अर्थ मंत्र्यांकडून मिंट रोड माईल स्टोन्स - आरबीआय 75 वर्षांची प्रसृत. |
फेब्रुवारी 11 2010 |
“होमी भाभा जन्म शताब्दी वर्षा” स्मरणार्थ रु.10/- ची नवी (दोन धातूंची) नाणी प्रसृत. |
मार्च 26, 2009 |
“युनिटी इन डायव्हर्सिटी” ह्या विषयाची रु.10/- ची नवी (दोन धातूंची) नाणी. |
मार्च 26, 2009 |
“कनेक्टिविटी अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी” ह्या विषयाची रु.10/- ची नवी(दोन धातूंची) नाणी |
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1257 |