नोव्हेंबर 22, 2016
रु.500/- व रु.1000/- मूल्याच्या विद्यमान बँक नोटांचे वैध चलन लक्षण काढून टाकणे
बदलून देण्याची सुविधा – गैरवापर केल्याचे अहवाल - जनतेला सावधानतेचा इशारा
घोषणा केल्याच्या तारखेस विहित बँक नोटा (रु.500 व रु.1000 च्या जुन्या नोटा) जवळ असलेल्या जनतेला ह्या नोटांचे मूल्य, अदलाबदल करुन किंवा बँक खात्यात जमा करुन त्यांना वैध चलन स्वरुपात मिळावे ह्यासाठी, त्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा कितीही संख्येने बँक खात्यात जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
असे कळविण्यात आले आहे की, काही भोळ्या व्यक्ती इतरांच्या वतीने ह्या नोटा बदलून घेत आहेत आणि काही व्यक्ती तर, बेकायदा साठविलेली रोकड त्यांच्या स्वतःच्या खात्यात जमा करुन त्यांना मदतच करत आहेत. ह्यासाठी, प्रधान मंत्री जनधन योजना खात्यांचाही वापर केला जात आहे.
जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की, अनधिकृत रितीने, विहित बँक नोटा बदलून घेणे/हाताळणे हे बेकायदेशीर असून त्यासाठी कडक दंडात्मक कारवाई होऊ शकते.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1283 |