नोव्हेंबर 22, 2016
इलेक्ट्रॉनिक प्रदानांना प्रोत्साहन देण्यासाठी खास उपाय
जनतेच्या व्यावहारिक गरजा डिजिटल रितीने पूर्ण करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, छोट्या व्यापा-यांसाठी विशेष वाटप/वितरण करुन आणि सेमी क्लोज्ड प्रिपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट्सच्या (पीपीआय) मर्यादा वाढवून अतिरिक्त उपाय सुरु केले आहेत.
आता छोट्या व्यापा-यांसाठी एक खास/विशेष वितरण सुरु केले गेले असून पीपीआय देणा-या संस्था, अशा व्यापा-यांना पीपीआय देऊ शकतात. कोणत्याही वेळी अशा पीपीआयमधील शिल्लक रु.20,000/- च्या वर असत नसली तरीही, असे व्यापारी, प्रति व्यवहार कितीही मर्यादा असली तरीही, अशा पीपीआयमधून, त्यांच्या स्वतःच्या जोडणी-बँकेच्या खात्यात प्रति महिना रु.50,000/- पर्यंत हस्तांतरित करु शकतात. व्यापा-यांना त्यांच्या दर्जा/स्थिती बाबतचे केवळ एक घोषणापत्र व त्यांच्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.
किमान माहितीसह दिलेल्या सेमी क्लोज्ड पीपीआयची मर्यादा विद्यमान रु.10,000/- पासून रु.20,000/- पर्यंत वाढविण्यात आली आहे. दिलेल्या कोणत्याही महिन्यामधील रिलोड्सचे मूल्य रु.20,000/- पर्यंत वाढविण्यात आले आहे.
इतर प्रकारच्या पीपीआयसाठीच्या विद्यमान सूचनांमध्ये कोणताही बदल नाही. प्राधिकृत पीपीआय देणा-या संस्था, रु.1,00,000/- पर्यंतची शिल्लक असलेले केवायसी-पीपीआय देणे सुरु ठेवू शकतात.
वरील उपाय, नोव्हेंबर 21, 2016 पासून डिसेंबर 30, 2016 पर्यंत, पुनरावलोकनाच्या अटीवर जारी असतील.
ह्यापूर्वीच्या पीपीआय-मार्गदर्शक तत्वांमध्ये, अशा व्यापा-यांसाठी एक निराळा वर्ग म्हणून पीपीआय उघडण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. आणि किमान माहितीसह दिलेल्या सेमी-क्लोज्ड पीपीआय साठीची मर्यादा रु.10,000/- होती.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1282 |