Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (62.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/10/2016
सेंट्रल बँक ऑफ म्यानमार ह्यांच्याबरोबर ‘पर्यवेक्षणीय सहकार व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान’ वरील एमओयु वर आरबीआयद्वारा हस्ताक्षर

ऑक्टोबर 21, 2016

सेंट्रल बँक ऑफ म्यानमार ह्यांच्याबरोबर ‘पर्यवेक्षणीय सहकार व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान’ वरील एमओयु वर आरबीआयद्वारा हस्ताक्षर.

भारतीय रिझर्व बँकेने, ऑक्टोबर 19, 2016 रोजी, रिपब्लिक ऑफ युनियन ऑफ म्यानमारच्या सेंट्रल बँक ऑफ म्यानमार बरोबर ‘पर्यवेक्षणीय सहकार व पर्यवेक्षणीय माहितीचे आदान-प्रदान’ वरील एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. श्री. यु. क्याव टिन, म्यानमार सरकारचे विदेशी बाबींचे राज्यमंत्री ह्यांनी, सेंट्रल बँक ऑफ म्यानमारच्या वतीने, तर श्री. एस.एस.मुंद्रा, डेप्युटी गव्हर्नर ह्यांनी भारतीय रिझर्व बँकेच्या वतीने, नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका समारंभात, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे स्टेट कौंसेलर, एच ई आँग सान सुऊ क्यी ह्यांच्या सन्माननीय उपस्थितीत ह्या एमओयु वर स्वाक्ष-या केल्या.

अधिकतर सहकार मिळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यवेक्षणीय माहिती शेअर करण्यासाठी, रिझर्व बँकेने, काही देशांच्या पर्यवेक्षकांबरोबर सामंजस्य करार व पर्यवेक्षकीय सहकारासाठीच्या पत्रांवर स्वाक्षरी/करार केले आहेत. ह्या नव्या करारासह आरबीआयने आतापर्यंत अशा 34 एमओयु, एका पर्यवेक्षकीय सहकार-पत्र आणि एका सहकार-निवेदनावर सह्या केल्या आहेत.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/995

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä