Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (62.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/10/2016
इनसेट अक्षर एल, अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या परंतु इंटालिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या नोटांचे प्रसारण

ऑक्टोबर 24, 2016

इनसेट अक्षर एल, अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक असलेल्या परंतु इंटालिओ छपाई नसलेल्या रु.20 च्या नोटांचे प्रसारण

भारतीय रिझर्व बँक लवकरच, दोन्हीही अंक फलकात एल हे इनसेट अक्षर असलेल्या, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. रघुराम जी राजन ह्यांची सही असलेल्या व नोटेच्या मागील बाजूवर 2016 हे छपाईचे वर्ष असलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु. 20 मूल्याच्या नोटा प्रसृत करणार आहे.

आता प्रसृत केल्या जाणा-या ह्या बँक नोटांचे डिझाईन, अलिकडेच दिलेल्या, महात्मा गांधी मालिका - 2005 मधील रु.20 च्या बँक नोटांप्रमाणेच परंतु अंक फलकामध्ये वाढत्या आकाराचे अंक, इंटालिओ छपाई नसलेले, सुप्त प्रतिमा नसलेले आणि ओळख चिन्ह नसलेले असेल. तसेच इंटालिओ छपाई काढून टाकली असल्याने, दर्शनी बाजूवरील रंग थोडा फिकट/हलका असेल. (संदर्भ - वृत्तपत्र निवेदन क्र. 2016- 2017/678, दि. सप्टेंबर 15, 2016).

ह्या बँकेने पूर्वी दिलेल्या रु.20 च्या नोटाही वैध चलन असणे सुरुच राहील

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1004

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä