नोव्हेंबर 30, 2016
इंडियन मर्कंटाईल सहकारी बँक लि. लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस)
च्या कलम 35अ खाली दिलेल्या निदेशात आरबीआयकडून बदल/सुधारणा
भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, ऑक्टोबर 19, 2015 रोजीच्या तिच्या निदेशातील अंशतः बदल/सुधारणेमध्ये, इंडियन मर्कंटाईल सहकारी बँक लि. ह्यांच्यावरील निदेशांमध्ये बदल/सुधारणा करण्यात आली आहे. जून 4, 2014 च्या निदेशान्वये वरील बँक, जून 12, 2014 पासून निदेशांखाली ठेवण्यात आली होती.
ऑक्टोबर 19, 2015 च्या निदेशांनुसार, इतर अटींबरोबर निदेश लागु झाल्यावर आधीच परवानगी देण्यात आलेल्या रु.1,00,000 (रुपये एक लाख) च्या वरील, कमाल रु.15,00,000 (रुपये 15 लाख) पर्यंतची व एखाद्या ठेवीदाराने ठेवलेल्या, प्रत्येक बचत खात्यातील किंवा मुदत ठेव खात्यातील किंवा कोणतेही नाव असलेल्या ठेव खात्यातील रकमेच्या 70% (सत्तर टक्के) पर्यंतची रक्कम काढल्यास त्या ठेवीदाराला परवानगी आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेच्या स्थितीचे पुनरावलोकन केले असून, जनतेच्या हिताच्या दृष्टीने वरील निदेशात बदल/सुधारणा करण्याचा विचार केला आहे.
त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) व (2) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक येथे निदेश देत आहे की, इंडियन मर्कंटाईल सहकारी बँक लि. ह्यांना, ऑक्टोबर 19, 2015 रोजी देण्यात आलेल्या निदेशाचा परिच्छेद 3 पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात यावा.
“ठेवीदाराने ठेवलेल्या प्रत्येक बचत खात्यात किंवा चालु खात्यात किंवा मुदत ठेव खात्यात किंवा कोणतेही नाव असलेल्या खात्यात ठेवलेल्या ठेव रकमेच्या 70% (सत्तर टक्के) पर्यंतची रक्कम (जी हे निदेश लागु केल्यानंतर काढण्यास परवानगी देण्यात आलेल्या रु.1,00,000 (रुपये एक लाख) पेक्षा जास्त असू शकेल) काढण्यास त्या ठेवीदाराला परवानगी दिली जावी. मात्र, त्या ठेवीदारावर त्या बँकेचे कोणत्याही प्रकारचे दायित्व असल्यास (कर्जदार किंवा हमीदार, बँकेत ठेवलेल्या ठेवींविरुध्द घेतलेली कर्जे ह्यासह), ती रक्कम संबंधित कर्ज खात्यात समायोजित केली जावी.”
इंडियन मर्कंटाईल सहकारी बँक लि., लखनऊ ह्यांना, जून 4, 2014 रोजी दिल्या गेलेल्या निदेशामधील इतर निर्बंध, अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल नाही आणि ते निदेश, पुनरावलोकनाच्या अटीवर, मार्च 11, 2017 च्या व्यवहार बंद होईपर्यंत लागु असणे सुरुच राहील.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1372 |