नोव्हेंबर 07, 2016
आरबीआयकडून श्री. एम राजेश्वर राव ह्यांची ईडी म्हणून नेमणुक
श्री. जी महालिंगम ह्यांनी रिझर्व बँकेमधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने, त्यांच्या जागी, रिझर्व बँकेने श्री. एम. राजेश्वर राव ह्यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक केली आहे. कार्यकारी संचालक ह्या नात्याने, श्री. राजेश्वर राव, सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, वित्तीय बाजार ऑपरेशन विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभाग ह्यांचा कारभार पाहतील. कार्यकारी संचालक म्हणून नेमणुक होण्यापूर्वी, श्री. राजेश्वर राव हे वित्तीय बाजार ऑपरेशन्स विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक होते.
श्री. राजेश्वर राव हे अर्थशास्त्रामधील बी.ए. असून कोचीन विश्व विद्यालयाचे मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन आहेत. त्याचप्रमाणे ते इंस्टिट्युट ऑफ बँकर्सचे सर्टिफिकेटेड असोशिएट आहेत.
श्री. राजेश्वर राव 1984 मध्ये रिझर्व बँकेत रुजु झाले व एक करियर सेंट्रल बँकर म्हणून त्यांना सेंट्रल बँक कार्याच्या निरनिराळ्या पैलूंचा अनुभव आहे. ह्यापूर्वी त्यांनी जोखीम देखरेख विभागाचा प्रभार स्वीकारला होता. नवी दिल्ली येथे त्यांनी बँकिंग लोकपाल म्हणून आणि अहमदाबाद, हैद्राबाद, चेन्नई व नवी दिल्ली येथील रिझर्व बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांमध्येही काम केले आहे.
अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1127 |