Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (79.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/12/2016
एसबीएनचे वैध चलन लक्षण काढून घेण्यात येणे : असुरक्षित/अनधिकृत वाहिन्यांवरुन मिळालेल्या माहिती विरुध्द आरबीआयचा सावधानतेचा इशारा

डिसेंबर 01, 2016

एसबीएनचे वैध चलन लक्षण काढून घेण्यात येणे : असुरक्षित/अनधिकृत वाहिन्यांवरुन
मिळालेल्या माहिती विरुध्द आरबीआयचा सावधानतेचा इशारा

विहित बँक नोटांचे (एसबीएन) वैध चलन लक्षण काढून टाकण्यात आले असल्याने, भारतीय रिझर्व बँक, बँकांना वेळोवेळी सूचना पाठवीत आहे व ह्या सूचना बँकांकडे थेट व ई-मेल द्वारा पाठविल्या जात आहेत. ह्या सूचना रिझर्व बँकेच्या वेब साईटवरही (https://www.rbi.org.in) टाकण्यात आल्या आहेत.

आम्हाला असेही कळविण्यात आले आहे की, काही मार्गदर्शक तत्वे/सूचना रिझर्व बँकेनेच दिलेल्या असल्याचे भासवून, काही तत्वशून्य घटकांकडून त्या सामाजिक माध्यमांमधून प्रसारित केल्या जात असून त्यामुळे जनता/बँक अधिका-यांच्या मनात गोंधळ निर्माण होत आहे.

ह्यासाठी, जनतेला व बँकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी केवळ रिझर्व बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर (https://www.rbi.org.in) अपलोड केलेल्या किंवा रिझर्व बँकेच्या अधिकृत ई-मेल द्वारा मिळालेल्या सूचनांचेच मार्गदर्शन घ्यावे.

बँका तसेच जनतेला सांगण्यात येते की, त्यांनी इतर असुरक्षित/सामाजिक माध्यमांसारख्या अनधिकृत वाहिन्यांवर विश्वास ठेवू नये, कारण त्यांच्यामधून प्रसारित केलेले कागदपत्र शंकास्पद व पडताळून न पाहण्याजोगे असतात.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/1382

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä