ऑक्टोबर 01, 2016
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली, अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निदेशांना मुदतवाढ अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा, महाराष्ट्र ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली, निदेश क्र. डीसीबीएस.सीओ.बीएसडी-1 क्र.डी-19/12.22.328/2015-16 दि. सप्टेंबर 28, 2015 अन्वये, सप्टेंबर 30, 2015 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निदेशांखाली ठेवण्यात आले होते. आमचे, मार्च 29, 2016 च्या निदेशांअन्वये वरील निदेशांची वैधता सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आली होती. जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की मार्च 29, 2016 रोजी दिलेल्या निदेशांसह वाचित, वरील सप्टेंबर 28, 2016 रोजी, अजिंक्यतारा सहकारी बँक लि., सातारा ह्यांना दिलेले निदेश, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, आमचे सुधारित निदेश क्र. डीसीबीआर.सीओ.एआयडी/डी-08/12.22.328/2015-16 दि. सप्टेंबर 28, 2016 अन्वये, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे मार्च, 30, 2017 पर्यंत लागु असतील. संदर्भित निदेशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. सप्टेंबर 28, 2016 च्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/829
|